Monday, 11 November 2013

प्रेम आणि फुल...

          प्रेम म्हणजे नक्की काय असतं ? हे मलापण माहित नाही, पण ते एखाद्या फुलासारखा असाव असच मला वाटत..

          प्रेम हे फुलासारखा असतं, कारण त्याच्या पाकळ्यांमध्ये प्रेमाचे रंग असतात.ते सगळ्यात आधी एक छोटीशी 'कळी' असते. त्या कळीलाच आपण मैत्री असं बोलतो.ती कळी जसजशी मोठी होत जाते, तसे ते फुल म्हणजेच प्रेम वाढत असतं. त्या फुलाच्या पानांमध्ये आठवणींची हिरवळ असते. कधी कधी आपण ह्या आठवणींना विसरतो आणि ते पान गळून पडत. त्या फुलाचा जो देठ असतो त्यालाच विश्वास, आधार असं म्हणतात. हा देठ जर मजबूत नसेल तर ते फुल काही क्षणातच तुटून पडतं.

          कारण या देठावरच काटे असतात त्या काट्यांना अविश्वास, संशय, अहंकार असं म्हणतात. हे काटे हाताला (आपल्याला) टोचतात आणि जेव्हा आपली चूक कळते, तेव्हाच आपल्याला कळतं ते फुल (प्रेम) किती सुंदर असतं, पण ह्या काट्यांमुळेच ते हातुन निसटतं.

          हे फुल (प्रेम) वाढतं ते मैत्रीने, सोबतीने, विश्वासाने, आपुलकीने. म्हणूनच ते जपायच असतं, सांभाळायच असतं, वाढवायच असतं.

                                                                                                           .... शिवम

2 comments: